Thursday , June 4 2026
Breaking News

कर्नाटक राज्य संयुक्त आशा वर्कर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : आरसीएच पोर्टलच्या विविध समस्यांमुळे गेल्या दोन वर्षांपासून कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य संयुक्त आशा वर्कर्स असोसिएशनच्या वतीने सुवर्णसौधजवळील बस्तवाड येथे मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

आरसीएच पोर्टलमधील असंख्य समस्यांमुळे अनेक कामांचा मोबदला मिळत नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोविड नॉन एमटीआयएससाठी 2,000 रु. देखील त्यांना मिळाले नाही त्यांना संघ आधारित प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील आशा कामगारांचे अतिरिक्त काम आणि शहरी जीवनातील महागडे खर्च यांच्याशी सुसंगत नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आदेश द्यावेत. तसेच आशा वर्कर्सनाच्या पदांनुसार मासिक मानधन व दर भत्ते निश्चित करावेत, अशी मागणी आशा कार्यकर्त्यानी केली आहे. या आंदोलनात आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *