बेळगाव : बिजगर्णी गावातील सुकन्या कु. तेजस्विनी नागेश कांबळे हिचा सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कु. तेजस्वीनी कांबळे हिने मराठी विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे
सीमाभागात मराठीभाषा वाढली पाहिजे. तिचे संवर्धन करणे हे विद्यार्थीदशेतच आवश्यक आहे. मराठीभाषेविषयी अभिमान वाटतो. मराठीतील पुस्तके वाचायला हवीत. मातृभाषेत शिकायला हवे, असे मनोगत तिने व्यक्त केले.
महाराष्ट्रराज्य शिक्षणमंत्री व मराठीभाषा मंत्री दीपकभाई केसरकर, मुंबईचे उद्योजक पुष्कराज कोले. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, जावेद शेख, एस. आर. मांगले, प्रा. रूपेश पाटील, प्रा. नागेश कदम, निलेश पारकर सौ. शामल मांजरेकर (वेंगुर्ले) साहित्यिका सौ. उषा परब, संपादक सागर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित तेजस्वीनीचा सन्मान करण्यात आला.
ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडीत आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने कावळेवाडी येथील वाचनालयचे पदाधिकारी मनोहर मोरे, पृथ्वी जाधव, रेखा मोरे, सूरज मोरे उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील, आभार निलेश पारकर यांनी मानले.