बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य मडीवाळ संघाने मंगळवारी सुवर्ण विधान सौधजवळील बस्तवाड येथे आंदोलन केले.
मंगळवारी मडीवाळ संघाने आंदोलन छेडून आपली विविध मागण्याच्या पूर्ततेचा आग्रह केला. विष्ठा, मूत्र, बाळंतपण, मासिक पाळी, मृत्यू, रोग, पू, रक्त यांनी डागाळलेले सर्व समाजातील लोकांचे कपडे आम्ही हाताने धुतो आणि स्वच्छ करतो. जे लोक अशा घाणेरड्या कपड्यांना हात लावून स्वच्छ करतात, लोक त्यांनाच दूर लोटतात याचा निषेध आंदोलकांनी केला आहे.
ग्रामीण भागात आपण घरोघरी, मंदिरात, सामाजिक कार्यक्रमात, धार्मिक सण, मंगल कार्यात रात्रंदिवस व्यस्त असतो, विविध त्वचारोगांनी त्रस्त असतो. आंदोलकांनी आत्तापर्यंत आम्हाला शासकीय सुविधा दिल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
आर. व्ही. राजण्णा, एच. व्ही. नागराज, बाळप्पा मडीवाळ, आर. मूर्ती आदी उपस्थित होते.