कागवाड : कागवाड मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुसनाळ आणि मोळवाड गावांना कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत (तात्या) पाटील यांनी भेट देऊन वाढत्या पाण्याची पाहणी केली कुसनाळ ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्या समस्यांना योग्य उत्तरे दिली. पूर आल्यास गावकऱ्यांना निवारा केंद्रात नेण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्याची विनंती गावातील नेत्यांनी …
Read More »LOCAL NEWS
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रादेशिक विकास निधीतून 9 रुग्णवाहिकांचे वाटप
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका : खासदार अण्णासाहेब जोल्ले बेळगाव : चिकोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी 2019-20 या वर्षासाठी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत एकूण 9 सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकां प्रदान केल्या आहेत. सुवर्ण विधानसौध प्रांगणात शुक्रवारी (१५ जून) झालेल्या कार्यक्रमात …
Read More »प्रादेशिक आयुक्त आदित्य बिस्वास यांची बदली रद्द करा
बेळगाव : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक अम्लान आदित्य बिस्वास यांची बदली रद्द करण्याच्या मागणी साठी बेळगावमधील विविध संघटना, पक्ष आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले आहे. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक यांच्या बदलीचा आदेश आला असून सदर बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे …
Read More »“हा माझा धर्म पशू बचाव दल”तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : “हा माझा धर्म पशू बचाव दल”तर्फे सलग दुसऱ्या वर्षी वारकरी वेशभूषा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. दि. 10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी निमित्त हा माझा धर्म पशू बचाव दल तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा (ऑनलाईन) घेण्यात आली. या स्पर्धेत शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. बेळगाव परिसरा सोबत ठाणे, कोल्हापूर, …
Read More »एपीएमसी, रविवार पेठ उद्या बंद
बेळगाव : केंद्र सरकारने धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात बेळगाव शहरातील धान्य व्यापाऱ्यांनी शनिवारी बंद पुकारला आहे. शनिवारी धान्यांची दुकाने बंद असणार आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून, तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आहार धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. …
Read More »समर्थनगर येथे आढळला घोणस सर्प
बेळगाव : समर्थनगर चौथा क्रॉस येथील रहिवासी विनायक कोकितकर यांच्या घराच्या मागील बाजूस 5.9 फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. कोकितकर यांनी लागलीच सर्पमित्र अक्षय हुंदरे यांना कळविले. अक्षय हुंदरे यांनी शिताफीने साप पकडून मंडोळीच्या डोंगरात सोडून दिले. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सर्पमित्र अक्षय हुंदरे यांनी सांगितले …
Read More »शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री. चिदंबर अग्निहोत्री आणि प्रमुख पाहुणे म्हणून दीपा गट्टद मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागतगीताने …
Read More »बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी..
बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, पावसाचा जोर वाढल्याने बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज शुक्रवार (१५ जुलै) आणि उद्या शनिवार (१६ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Read More »मुडलगी तालुक्यात विजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू
बेळगाव : मुडलगी तालुक्यातील तिगडी गावात ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती करताना लाईनमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तिगडी गावात हेस्कॉमचे कर्मचारी निंगाप्पा करीगौडर (38) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निंगाप्पा यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी निषेध व्यक्त केला आहे. कुलगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
Read More »कर्नाटकाला मिळणार नऊ वॉटर एरोड्रोम; काळी नदी, अलमट्टी, हिडकल जलाशय येथे जल एरोड्रॉम्सची योजना
बंगळूर : राज्यभरात नऊ वॉटर एरोड्रोम विकसित केले जातील, असे सांगून पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकला अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देताना विमानचालन-नेतृत्वाच्या विकासावर “टेक ऑफ” करण्यास त्यांची मदत होईल. कर्नाटकसाठी सर्वंकष नागरी विमान वाहतूक धोरण तयार करण्याबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सोमण्णा बोलत होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta