Sunday , July 26 2026
Breaking News

आयसीएलच्या सेवा कार्यालयाचे बेळगावात उद्घाटन

Spread the love


बेळगाव : “बेळगावचा देशातील विविध राज्यांशी आणि शहरांशी व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीने संपर्क वाढला असून बेळगावात इंटिग्रेटेड कुरियर्स अंड लॉजिस्टिक (आयसीएल) सेवा सुरू झाल्याने ग्राहकांची उत्तम सोय झाली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आयएक्सजीची निवड झाली आहे. यामुळे बेळगावकराना जगभरात आपल्या वस्तू कमीत कमी वेळात पाठविता येणे शक्य आहे” असे विचार बेळगाव विमानतळचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी बोलताना व्यक्त केले. बुधवारी आयपीएलच्या बेळगाव कार्यालयाचे उद्घाटन सराफ कॉलनी, टिळकवाडी येथे करण्यात आले त्याप्रसंगी श्री. मौर्य बोलत होते.
यावेळी आयसीएलचे सीईओ जी. व्ही. रामन्ना आणि मौर्य या दोघांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलित करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना रामन्ना यांनी आपले मुख्य कार्यालय हैदराबाद येथे असून देशामध्ये 48 ठिकाणी आमच्या शाखा आहेत आणि आम्ही जगभरात विविध वस्तू पाठवण्याची सोय केली आहे. गेल्या 16 वर्षात आमचा टर्न ओव्हर तीनशे कोटीचा होता तो येत्या दोन वर्षात पाचशे कोटीला पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी आयएक्सजीचे प्रमुख श्री. विद्याधर पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि “जसे बेळगावच्या जनतेला इथून परदेशात वस्तू पाठवता येतील तशाच परदेशातूनही इथं आणता येतील” असे त्यांनी सांगितले. आपल्या माध्यमातून इतर पदार्थाबरोबरच लोणची, मसाले, भांडी, कपडे यासारख्या वस्तू किफायतशीर दरात वेळेवर पोहोचवता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांचे सहकारी नागतिलक गणीकोप यांनी प्रास्ताविक केले. आणि सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी कंपनीचे मुंबई प्रतिनिधी वैभव वाळवेकर यांच्यासह अनेक निमंत्रित उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *