Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

शास्त्रीय सहागायनाच्या कल्पकतेने उलगडला आगळा संगीत अविष्कार

बेळगाव (प्रतिनिधी) : आर्ट्स सर्कलने रविवारी शास्त्रीय सह गायनाचा आगळा कार्यक्रम सादर केला. या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने. …

Read More »

लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बेळगाव (प्रतिनिधी) : लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अपूर्व उत्साहात पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, क्षेत्र शिक्षणाधिकारी रवि बजंत्री, डाॅ. हरप्रित कौर, चेअरमन राज घाटगे, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे व प्राचार्या लक्ष्मी इंचल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शाम घाटगे होते. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि …

Read More »

कर्तव्य महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा

बेळगाव : चव्हाट गल्ली येथील कर्तव्य महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन गुणवंत विद्यार्थिनी आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याद्वारे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्य महिला मंडळातर्फे चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाऊंडेशनच्या संचालिका …

Read More »

कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमधील विद्यार्थिनींना निरोप

बेळगाव : कित्तूर येथील मुलींसाठी असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमध्ये 2021 -2022 सालातील बारावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शनिवारी दिमाखात पार पडला. कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल सत्यवीर सिंग आणि सन्माननीय अतिथी म्हणून आरएमएस बेळगावच्या एडम …

Read More »

शरीरसौष्ठव चषक अनावरण सोहळा संपन्न

बेळगाव : भीम वाल्मिकी युव संघटनेच्या वतीने कलमेश्वर बसवेश्वर श्री 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी बसवन कुडची येथे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त 26 मार्च रोजी बसवन कुडची येथील मंगल कार्यालयात या स्पर्धेचे चषक अनावरण सोहळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …

Read More »

ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

बेळगाव : ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे शहरातील चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आज सकाळी पार पडला. ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आज सकाळी विविध प्रकारच्या झाडांची 100 हून अधिक रोपे लावण्यात आली. चव्हाट गल्ली पंच …

Read More »

दहावी परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य

अधिकृत परीपत्रक जारी, हिजाब बंदीच्या पार्श्वभुमीवर आदेश बंगळूर : प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारपासून सुरू होणार्‍या दहावी (एसएसएलसी) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य करणारे परिपत्रक जारी केले आहे. कालच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी हिजाब घालून येणार्‍या विद्याथीनीना परीक्षेत प्रवेश दिला जाणर नसल्याचे स्पष्ट केले …

Read More »

भग्न प्रतिमा संकलनाचा लोकसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

बेळगाव : सुळेभावी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवी देवस्थान आणि श्री क्षेत्र कलमेश्वर मंदिर परिसरात इतरत्र टाकण्यात आलेल्या देव-देवतांच्या भग्न प्रतिमा विधीवत दहन करण्यासाठी संकलित करण्याचा स्तुत्य उपक्रम सर्व लोकसेवा फाऊंडेशन बेळगावचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी आज आपल्या फाऊंडेशनतर्फे राबविला. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असणार्‍या …

Read More »

श्री दुर्गा सेवा संघटना बेळगाव यांच्यावतीने बेळगावच्या भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

बेळगाव : श्री दुर्गा सेवा संघटना बेळगाव यांच्यावतीने बेळगावच्या भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे या किल्ल्याला आता चांगले भवितव्य मिळणार आहे. बेळगाव परिसरातील अनेक शिवभक्त या संघटनेमध्ये सामील असून या संघटनेच्या वतीने अनेक किल्ल्यावर हे अभियान यापूर्वी राबविण्यात आले आहे. आता या किल्ल्यावरील झाडेझुडपे, …

Read More »

बेळगावचे संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार 2022 प्रदान

बेळगाव : सोलापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात बेळगावचे युवा संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना ‘पंडीत चिदानंद जाधव युवा गंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये अकरा हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक भीमण्णा जाधव, डॉ. श्रीकांत …

Read More »