बेंगळुरू : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतरच राज्यात बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना सुरेशकुमार म्हणाले, मुलांचा भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घ्यावी असा जोरडा अभिप्राय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा घेऊ नये असाही मतप्रवाह आहे. मात्र सध्या परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. ज्येष्ठ वैध्य डॉ. गिरीधर बाबू यांनी विद्यार्थ्यांना लस देऊन मग परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सध्या विध्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. पुढील काळात याबाबत माहिती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.