मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणार्या 29 सदस्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांची नावे : डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, फ. मु. शिंदे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रवींद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, प्रा. एल. बी. पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रवींद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.
डॉ. रणधीर शिंदे यांची निवड
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख व समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉ. शिंदे हे बार्शी (जि. सोलापूर) तालुक्यातील घाणेगावचे आहे. 1998 नंतर त्यांनी पाच वर्ष सांगलीच्या जी. डी.बापू लाड महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. सध्या ते शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. काव्य समीक्षा, वैचारिक लेखन त्यांचे विषय आहेत. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. रणधीर शिंदे व फेसाटीकार नवनाथ गोरे यांची साहित्य मंडळावर निवड झाली. गुरु-शिष्याची जोडीची पहिल्यांदाच निवड झाली आहे.
विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीधर दीक्षित
मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. डॉ. श्रीधर दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 5 मार्च 2019 रोजी 30 सदस्यांच्या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. हे मंडळ तीन वर्षासाठी अस्तित्वात असणार होते. तत्पूर्वी करंबेळकर यांनी राजीनामा दिला. नवीन मंडळातील सदस्य पुढीलप्रमाणे : डॉ. भीमराव उलमेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुण भोसले, राहुल देशमुख, प्रभाकर देव, हेमंत राजोपाध्ये, सतीश आळेकर, सुबोध जावडेकर, आसाराम लोमटे, डॉ. रवींद्र रवींद्रनाथ, निखिलेश चित्रे, डॉ. प्रकाश पवार, शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे, प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा नांद्रे, प्रा. संतोष पवार, मनीषा उगले, भाऊसाहेब चासकर व प्रा. उल्हास पाटील.