चंदगड (ज्ञानेश्वर पाटील : सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथील सांस्कृतिक एन.एस.एस. यांच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रा.डॉ.आर डी. कांबळे यांनी केले आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करून दोन्ही कार्यक्रमांचे स्वरूप विशद केले.
महाविद्यालयातील प्रा. एस.जे.पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर डॉ. व्हीं. आर पाटील यांनी शाहू राजे यांच्या कार्याचा आढावा आपल्या शब्दात मांडला. त्यानंतर डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते आणि उपस्थित सर्व प्राध्यापकांच्या व प्रशासकीय अधिकारी सेवक कर्मचारी यांच्याहस्ते महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 50 सागवान वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवरांचे आभार प्रा. डॉ.के.एस. काळे यांनी मांडले. सदर कार्यक्रम प्रसंगी याप्रसंगी प्रा. डॉ. ए. एस. आरबोळे, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. ए के.कांबळे, प्रा.आर. टी.पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. दीपक पाटील, डॉ. के. पी. वाघमारे, प्रा.मुकेश कांबळे, डॉ.श्रीकांत पाटील, विलास शेटजी, दयानंद पाटील, मारुती बिर्जे, प्रा. एन. पी. महागावकर, अजित व्हण्याळकर, दीपक पाटील, लक्ष्मण बागीलगेकर यासह आदी मंडळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.