
आरोही-राहीला रजतपदक
संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातून ३२० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत संकेश्वर रोलर स्केटिंग ॲकॅडमीचा स्केटिंगपटू प्रितम कल्याणकुमार निलाज (ओरिजनल) इनलाईन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड काॅईनचा मानकरी ठरला आहे. १० वयोगटातील स्पर्धेत प्रितमने पुणे-मुंबई येथील स्पर्धकांना मागे टाकले आहे. स्पर्धेत कुमारी आरोही शिलेदार, कुमारी राही कल्याणकुमार निलाज हिने सिल्वर मेडल पटकाविले आहे. सांगली राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या स्केटिंगपटूंना संकेश्वर रोलर स्केटिंग ॲकॅडमीच्या प्रशिक्षिका प्रमिला शिल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्केटिंगपटू प्रितम निलाज, राही निलाज हे संकेश्वर एस.एस.के पाटील खातेदार इंग्रजी माध्यम शाळेचे विद्यार्थी असल्याने एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. स्पर्धेत पुणे, मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सातारा येथील स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta