Sunday , September 20 2026
Breaking News

येळ्ळूर ग्राम पंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट

Spread the love

बेळगाव : बुधवार दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी येळ्ळूर ग्राम पंचायतीला बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी धावती भेट घेतली. यावेळी एम. जी. हिरेमठ यांना येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पंचायतचे नूतनीकरण केलेल्या कामाची पाहणी करून कामाचे कौतुक केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीनं निवेदन देण्यात आली. सर्व प्रथम गावाच्या सभोवताली एक किलोमीटर पर्यंत गावठाण म्हणून नोंद करावी, असे निवेदन देण्यात आले. तसेच गावातील दारू विक्री बंद करा असेही निवेदनात म्हटले आहे.
येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेनसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, शशीकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, राजू डोंन्यांनावर, अरविंद पटील,वविलास बेडरे, रूपा पुन्यानावर, सुवर्णा बिजगरकर, सोनाली येळ्ळूरकर, मनीषा घाडी, वनिता परीट, रुक्मिणी नाईक, पीडिओ अरुण नाईक, सेक्रेटरी सदानंद मराठे, तलाठी मयूर मासेकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *