
संकेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे दंतरोग तज्ञ डॉ. शितल भिडे यांनी सांगितले. येथील श्री साई भवन येथे श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी महिला योगसाधकांतर्फे डॉ. शितल भिडे यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती अनिता नागराळे, नगरसेविका सौ. सुचिता परीट यांनी भूषविले होते. उपस्थितांचे स्वागत श्रीमती अश्विनी चिनमुरी यांनी केले.

डाॅ. शितल भिडे पुढे म्हणाल्या, श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रात महिलांनी प्रवेश घेऊन योग-प्राणायम, ध्यानधारणा शिकून आरोग्यवंत होण्याचे कार्य करायला हवे आहे. घर-संसार सांभाळतात महिला स्वतःच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होते. ज्या घरात महिला आरोग्यसंपन्न असतात ते घराचे सदस्य निश्चितच आरोग्यसंपन्न असतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना महिलांच्या आरोग्याचा विषय प्रामुख्याने विचाराधीन असायला हवा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रंजिता मगदूम यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लिना कोळी यांनी केले. श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे, शंकर चिनमुरी यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
Belgaum Varta Belgaum Varta