Monday , December 8 2025
Breaking News

संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी पुणे मॅरेथॉनमध्ये चमकला

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वरचा धावपटू प्रविण एम. गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय १० कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. पुणे मॅरेथॉनमध्ये देशभरातील ५०० धावपटूंनी सहभागी झाले होते.. त्यात संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांचा सहभाग संकेश्वरचं नाव मोठं करणार ठरले आहे. धावपटू प्रविणने कर्नाटक-महाराष्ट्रातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन ४५० मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ३ ते ५ कि.मी. अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रविण आजपावेतो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. पुणे मॅरेथॉन विषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रविण म्हणाला, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत देशभरातील अनेक नामवंत धावपटू सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर धावताना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आपण ३ ते ५ कि.मी. अंतराच्या अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांकाची ४५० हून अधिक बक्षिसे पटकावली आहेत. पाच कि.मी. अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत आपली पकड कायम राहीली आहे. पाच कि.मी. चे अंतर आपणाला १४ मिनिटांत पूर्ण करता येते. पाच कि.मी. धावणेचा सराव आपण कायम ठेवला आहे. त्यामुळे १० कि.मी. पाल्याची शर्यत थोडीसी भारी वाटते. तरी आपण यापूर्वी १० कि.मी. अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ७-८ बक्षिसे पटकावली आहेत. पुणे मॅरेथॉनमध्ये उतर प्रदेशचा धावपटू अंकित कुमार याने ३३ मिनिटे ४३ सेकंदात १० किं मी अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. दुसऱ्या क्रमांकावर उतर प्रदेशच्या मन्नू सिंग याला तर तिसऱ्या क्रमांकावर आपणाला समाधान मानावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *