
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हॉस्पिटल मधील सर्व महिला परिचारिका आणि स्टापला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सौ. सुरेखा नंदकुमार हावळ, डॉक्टर सुप्रिया प्रीतम हावळ, डॉ. स्मृती मंदार हावळ, बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांच्याकडून पुष्पगुच्छ मिठाई वाटप करुन शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी डॉ. स्मृती हावळ यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्षा
सौ. सविता सावंत, जयप्रकाश सावंत, डॉ. प्रीतम हावळ, प्रमोद कोळेकर, परिचारिका मनीषा, रुपाली, सुजाता, अश्विनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta