
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज हुताशनी पौर्णिमा होळी नजिक आल्याची आठवण करून देणारा ठरला. येत्या गुरुवारी दि. १७ रोजी होळी असल्यामुळे आज बाजारात टिमक्यांना फारशी मागणी कांही दिसली नाही. आज बाजारात टिमक्यांची जेमतेम विक्री झाल्याचे टिमकी व्यापारी राजू नार्वेकर यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले चमड्याच्या टिमक्यांची जागा आता प्लास्टीक टिमक्याने घेतली आहे. प्लास्टीक टिमक्यांचा दर तसा खिशाला परवडणारा आहे. आपल्याकडे ५० ते १०० रुपये किंमतीच्या आकर्षक टिमक्या उपलब्ध आहेत. होळी अजून आठवडाभर असल्याने टिमक्यांची विक्री जेमतेम झाल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta