
संकेश्वर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे लक्ष अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करुन देशाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. येत्या कांही वर्षांत अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे काम मोदीजी निश्चितपणे करतील असे भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर येथील श्रीरामसेना हिन्दुस्तान तालुका अध्यक्ष शाम यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले. शिवाजी पाटील साहेबांचे शाम यादव यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष लगमण्णा नवलाज, अभिजित बोरगांवी, बाबू शिंदे, अजित सनदी, शिवा संसुध्दी, रामा यादव, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta