Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट हटवा..

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील हिटणी येथील पोलिस चेकपोस्ट हटविण्याचे मागणी आज कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा, संकेश्वर श्रीरामसेना हिन्दुस्तान यांच्यावतीने उपतहसीलदार आर. एस. बडचेकर यांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे. कर्नाटकातील संकेश्वर येथून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. संकेश्वर-गडहिंग्लजला लोकांचे रोजचे येणे-जाणे सुरु असते. हिटणी येथील पोलीस चेकपोस्टमुळे दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांची मोठी कुचंबणा होत आहे. दररोज वाहनांच्या कागदोपत्रांची चौकशीचे सत्र सुरू असल्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील मुत्नाळ, निलजी, हिटणी येथील वाहनधारकांची पंचाईत होतांना दिसत आहे. वाहनधारकांना निष्कारण पोलीस चौकशीला सामोरे जावे लागत आहे. याकरिता हिटणी येथील पोलिस चेकपोस्ट हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे श्रीरामसेना हिन्दुस्तान तालुका अध्यक्ष शाम यादव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. उपतहसील कचेरीवर उपतहसीलदार आर. एस. बडचेकर यांना निवेदन सादर करताना भाजपा कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष लगमण्णा नवलाज, श्रीरामसेना हिन्दुस्तान तालुका अध्यक्ष शाम यादव, उमेश रामजी, भूषण पोवार, संतोष आरबोळे, योगेश पाटील कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *