संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरात रंगोत्सवाला ब्रेक देण्यात आला होता. तब्बल दोन वर्षानंतर यंदा रंगपंचमीचा मोठा जल्लोष दिसला. रंगोत्सवात छोट्या मुलांचा आनंद आणि युवा वर्गात रंगोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळाला. यंदाच्या रंगोत्सवात मुला-मुलींना, युवक-युवतींना रंगांची बेफाम उधळन करता आलेली पहावयास मिळाली. संकेश्वर पोलीस ठाण्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रविवारी संकेश्वर परिसरात धुलीवंदन-रंगपंचमी एकाच दिवशी अमाप उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
मुस्तफाकडून रंगांची भेट
संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याकचे उपाध्यक्ष मुस्तफा मकांनदार यांनी नदी गल्लीतील सौरभ सारवाडी, संदिप रोकडे, प्रेम केस्ती, सुमित कदम, रोहित इंगळे, विवेक मोरे, सौरभ इंगळे, यश सुर्यवंशी, प्रदीप बोरगली, साहिल शेख, सुरज कदम, योगेश जाधव, शिवा सुतार, प्रज्वल बोरगली, फरीद शेख, एकदंत शिंत्रे, आकाश जाधव, वासू सारवाडी यांना रंगांचे पाॅकीट वाटप करुन रंगोत्सवाला हातभर लावलेला दिसला. आज सकाळपासून छोट्या मुलांत रंगपंचमीचा माहोल पहावयास मिळाला. छोटी मुले-मुली रंगबेरंगी रंगांची उधळण पिचकारीतून करतानाचे चित्र पहावयास मिळाले. गावात ठिकठिकाणी डाॅल्बीच्या निनादात नृत्यात रममान होऊन युवक-युवतींकडून रंगांची बरसात होताना दिसली. यंदा सर्वांनी पक्या कडक रंगांपे्क्षा सुक्या रंगांची बरसात करुन रंगोत्सव साजरा केला. रंगोत्सवात विशेष करुन महिलांचाही मोठा सहभाग पहावयास मिळाला. काॅलेज युवक-युवतींनी देखील रंगोत्सवात आपला सहभाग दर्शविला. बहुतांश युवक मोटारसायकलवरुन टिमक्यांच्या निनादात रंगांची उधळण करतानाचे दृश्य पहावयास मिळाले. संकेश्वर पोलिसांनी वाद्यांचा गजर करण्यास आपली सहमती दर्शवून रंगपंचमीचा आनंद आणखी दुगणित केलेला दिसला. कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करीत रंगोत्सव साजरा केला. रंगोत्सवात हिन्दू-मुस्लीम युवक-युवतींनी सहभागी होऊन भाईचारा कायम केलेला दिसला. संकेश्वरात आजपावेतो हिन्दू-मुस्लिम तसेच सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. त्याचा प्रत्यय रंगोत्सवात लोकांना पहावयास मिळाला. सकाळपासून सुरु झालेला रंगोत्सव सायंकाळपर्यंत चाललेला दिसला. येथील मड्डी गल्लीत पालिकेचे सभापती सुनिल पर्वतराव, माजी सभापती पिंटू परीट, नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांचा रंगपंचमीच्या शुभेच्छा देणारा फलक झळकताना दिसला. रंगोत्सवात जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी नगरसेवक रोहण नेसरी, बसवराज बागलकोटी उमेश मनोळीमठ, सचिन सपाटे, महेश निलाज, आनंद हालदेवरमठ, सतीश नाईक, मुस्तफा मकांनदार, महंमदरेजा सोलापूरकर, संदिप दवडते, अनेक मान्यवर नागरिक युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसले.