
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गोंधळी समाज कमिटीकडून कर्नाटक गोंधळी समाज राज्य कार्यकारिणी सदस्य दत्ता महादेव दवडते, बेळगांव जिल्हा अध्यक्ष संदिप हरिभाऊ गोंधळी, बेळगांव जिल्हा सहसचिव शंकर नामदेव काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत रवि दवडते यांनी केले. यावेळी बोलताना दत्ता दवडते म्हणाले, संकेश्वर गोंधळी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी कंबर कसायला हवी आहे. समाजाच्या विकासासाठी सर्वांचा पुढाकार असायला हवे असल्याचे सांगितले. यावेळी दिपक सुगते, राजू आडेकर, दिपक दवडते, अनिल काळे, गणेश दवडते, विनायक दवडते, संदिप दवडते, संचालक, सभासद उपस्थित होते. आभार संदिप दवडते यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta