
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद हे गावातील विकासकामे आज-उद्यावर ढकलत वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत एक काम वर्षानुवर्षे थांब. अशी चालली आहे. गावातील २३ प्रभागात उपतहसीलदार नगरसेवक-नगरसेविकांना बोलावून घेऊन वार्डातील समस्या जाणून घेण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. अद्याप कोणतीच विकास कामे कांही हाती घेतली गेलेली नाहीत. येथील उपाध्ये चाळीतील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावरील सांडपाण्यातून लोकांचे तसेच कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे येणे-जाणे सुरु आहे. परवा ईटी साहेबांनी पहाणी करुन गटारीचे काम करुया की असे कुमार कब्बूरी यांना आश्वासन देऊन निघून गेले आहेत. गावातील गटारीचे काम असो रस्त्याचे काम आश्वासनांच्या झुल्यावर झुलवत ठेवणेत पालिका अधिकारी पटाईत झालेले दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta