
संकेश्वर (प्रतिनिधी) : वंध्यत्वाला लोकांचे राहणीमान (लाईफस्टाईल) कारणीभूत असल्याचे बेळगांव इंदिरा आयव्हीएफचे डॉ. दिपक शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये आयोजित मोफत वंध्यत्व मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शन करुन ते बोलत होते. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त हाॅस्पिटलमध्ये इंदिरा आयव्हीएफ तपासणी केंद्र प्रारंभ करण्यात आले आहे. डाॅ. दिपक शेट्टी पुढे म्हणाले, निसंतान वंध्यत्वाला लोकांचे राहणीमान प्रामुख्याने कारणीभूत ठरले आहे. वेळी-अवेळी जेवणे, तेलकट साखरेचे प्रमाण जादा असलेले भोजन सेवन करणे, अल्कोहोल, स्मोकींगच्या आहारी जाणे, करीयरच्या नादात मुलबाळ होणे टाळणे डिप्रेशन या गोष्टी वंध्यत्वाला कारणीभूत ठरल्या आहेत. पूर्वी निसंतानला महिलेला जबाबदार समजले जायचे. आज काळ बदलला आहे. निसंतानला महिला ४० % तर पुरुष ३०% कारणीभूत समजले जातात. आज देशांत निसंतानचे प्रमाण १५% आहे. शहरी भागात आणि ग्रामीण भागात देखील वंध्यत्वाचे प्रमाण समसमान राहिलेले दिसत आहे.शहरी भागात वंध्यत्व निवारणासाठी आयव्हीएफची सोय आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलने वंध्यत्व निवारण केंद्र प्रारंभ केले आहे. त्याचा लाभ हुक्केरी -गडहिंग्लज तालुक्यातील निसंतान दांपत्यानी घ्यावयाचा आहे. इंदिरा आयव्हीएफ सेंटर कोल्हापूर आणि बेळगांवमध्ये आहे. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये सल्ला केंद्र प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले.
संकेश्वरात इंदिरा आयव्हीएफची सोय
डॉ. सुप्रिया हावळ म्हणाल्या, संकेश्वर-हुक्केरी भागातील निसंतांन दांपत्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त इंदिरा आयव्हीएफ सल्ला केंद्र प्रारंभ केल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta