
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नवी गल्ली येथील युवक शिवानंद राजू शिडल्याळी (वय २३) यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आज गौरी ओढ्यातील वृक्षाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवानंद मानसिक त्रासाने अस्वस्थ होता. त्यातच त्याला फिटस आजाराने बेजार केले होते. तो सध्या येथील आझाद रस्ता इंद्रभवन हाॅटेलमध्ये कामाला होता. शिवानंद शिडल्याळी यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा देखील केली जात आहे. त्याचे एका मुलीवर प्रेम होते.ती मुलगी विवाहबद्ध होतात शिवानंद चांगलाच डिप्रेशनमध्ये होता. यातूनच तो व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या जिवनाचा अंत घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात शिवानंद शिडल्याळी यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणपती कोगनोळी अधिक चौकशी करताहेत. मृत शिवानंद यांच्या पश्चात आई-वडील, वडील बंधू असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta