संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संकेश्वरचा बुलंद आवाज शांत झालेला दिसला. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते गंभीर आजाराचा सामना करीत होते. हुक्केरी मतक्षेत्राच्या आखाड्यात संजय नष्टी यांच्या नावाचा उल्लेख केला जात असे. संकेश्वर लिंगायत रुद्रभूमी विकासासाठी आणि रुद्रभूमिला जागा मिळवून देण्यासाठी संजय नष्टी यांचे शर्थीचे प्रयत्न होते. संकेश्वर हिरण्यकेशी नदीला महापूर आलेल्या प्रसंगी पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा आणि कोरोनाच्या संकट काळात गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांना आहार किट मिळवून देणारा नेता आज हरपला आहे.
निडसोसी श्रींकडून नष्टी परिवाराचे सांत्वन
निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी लिंगैक्य संजय नष्टी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन नष्टी परिवाराचे सांत्वन केले. यावेळी संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता संजय नष्टी यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलित ठेवून अंत्ययात्रा अक्कमहादेवी कन्या शाळा ते संसुध्दी गल्ली, सुभाष रोड,बनेहरु रोड येथून लिंगाचा रुद्रभूमी अशी काढण्यात आली. रुद्रभूमित वीरशैव लिंगायत संप्रदाय नुसार शोकाकूल वातावरणात दफनविधी पार पाडण्रात आला. यावेळी अंबीराव पाटील, कुरबर समाजाचे नेते शंकरराव हेगडे गजानन क्वळी, राजिव संसुध्दी, बाबूराव मरीगुद्दी दयानंद महाळंक, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे संचालक शिवनायक नाईक, सभापती सुनील पर्वतराव, सोमगौंडा आरबोळे, व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसवराज बागलकोटी, गिरीशगौडा पाटील अभिजित कुरणकर राजेंद्र बोरगांवी, बसवराज बागलकोटी, महेश देसाई, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, गंगराम भूसगोळ, ॲड. प्रमोद होसमनी, मुख्याधिकारी जगदीश ईटी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, अशोक अंकलगी, प्रकाश नेसरी, शरीफ कारेकाजी, आझाद मुल्ला, झाकीर मोमीन, मिरासाहेब मोमीन, मराठा समाजाचे अध्यक्ष अप्पा मोरे, उपाध्यक्ष सुभाष कासारकर, पुष्पराज माने, बुरुड समाजाचे शंकर सपाटे, सचिन सपाटे, शिवा बोरगांवी, विनोद संसुध्दी, भिमराव सुतार, कुमार बस्तवाडी, आणप्पा संघाची, राहुल हंजी,-कुमार कब्बूरी, सर्व स्तरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. संजय नष्टी यांच्या पश्चात वडील, बंधू, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. संकश्वरचे मिरची व्यापारी शिवकुमार नष्टी यांचे ते भाऊ असून नगरसेविका सविता नष्टी यांचे ते पती होतं.
आईच्या तेरव्या दिनी मुलगाही दगावला
संकेश्वरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती निर्मला दुंडापण्णा नष्टी यांचे १६ मार्च २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या तेराव्या दिनी त्यांचे चिरंजीव नगरसेवक संजय नष्टी यांचे निधन झाले. आई-मुलगा तेरा दिवसांत निधन पावल्याने लोकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.