
संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे नुकत्याच पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंगपटू प्रितम कल्याणकुमार निलाज यांनी इनलाईन ५०० मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले.
दुसऱ्या क्रमांकाची मानकरी अन्वी गुरव तर तिसरा क्रमांक आरोही शिलेदार, राही निलाज हिने पटकाविला. क्वाड स्केटिंग ५०० मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस कृष्णा राजपूत यांनी पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावर सर्वेश राजपूत याला समाधान मानावे लागले. सर्व विजेत्या स्केटरना प्रशिक्षिका प्रमिला शिलेदार, अजितसिंग शिलेदार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्केटिंगपटूंना पालकांनी प्रोत्साहन देण्याचे कार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta