
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय महामार्गावरील पर्वतराव पेट्रोल पंपनजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर व्यक्ती मृतावस्थेत नजरेला पडताच लोकांनी संकेश्वर पोलिसांना कळविले आहे. संकेश्वर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. सदर अज्ञात मृत व्यक्तीचं वर्णन असे आहे. सदर व्यक्तीचं वय अंदाजे 55 असून उंची 5 फूउ 6 इंच आहे. रंग सावळा असून मध्यम बांधा आहे. वरील वर्णनाची व्यक्ती बेपत्ता किंवा ओळखीची असल्यास अशा लोकांनी ताबडतोब संकेश्वर पोलिसांशी संपर्क साधावयाचा आहे. संकेश्वर पोलिसांंशी संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 08333273303 मोबाईल क्रमांक 9480804072.
Belgaum Varta Belgaum Varta