
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील साईनाथ चित्रपटगृहाजवळच्या ओढ्यावरील ब्रिज (पूल) निर्माण कार्याचा नारळ राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी फोडला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पूल निर्माण आणि तेथील २४ मिटर रस्ता रुंदीकरण कामासाठी ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंत्री उमेश कत्तीं संकेश्वरच्या सर्वांगिण विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे घेऊन येत असले तरी त्या कामाला काडीमोल ठरविण्याचे काम मुख्याधिकारी जगदीश ईटी आणि सत्तारुढ गटाचे सदस्य, मंत्रीमहोदयांचे निकटवर्तीय लोक करतांना दिसत आहेत. मंत्रीमहोदयांनी संकेश्वरातील ब्रिटिशकालीन ब्रिज निर्माण कामाला ३.५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्याचे कार्य केले. सदर कार्याच्या शुभारंभाला मोजकेच सतारढ नगरसेवक आणि पीडब्लूडी विभागाचे अधिकारी मात्र उपस्थित दिसले. सदर कार्यक्रमाला पत्रकारांना बोलाविण्याचे मुद्दाम टाळून मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमाला “नो पब्लिसिटी” हे धोरण अवलंबिले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मंत्री उमेश कत्ती यांच्या कामाची चीज होईनाशी झाली आहे. संकेश्वरात उमेश कत्ती यांचा मतांचा टक्का यामुळेच तर वाढेनासा झाला आहे. उमेश कत्ती यांना कमी मते पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींचा आतातरी गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta