

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील सौ. लक्ष्मीबाई बाबू कासारकर यांच्या निवासस्थानी श्री रेणुकादेवी (आंबील) महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सुभाष कासारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीची पूजा करून महाप्रसादाचे पूजन केले. श्रींच्या हस्ते प्रसाद पूजनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. सौ. लक्ष्मीबाई कासारकर यांनी महिला भक्तगणांना देवीचा प्रसाद वाटप केला. कार्यक्रमाला माजी मंत्री ए. बी. पाटील, गंगाधर मुडशी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, ॲड. प्रविण नेसरी, संकेश्वर मराठा समाजाचे अध्यक्ष अप्पा मोरे, सुरेश चव्हाण, ॲड. थोरवत, सुधाकर ओतारी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, अविनाश नलवडे, नागेश क्वळी, प्रशांत कोळी, महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला भक्तगणांनी श्री रेणुकादेवीचे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta