Sunday , September 8 2024
Breaking News

कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात २.५ लाख रुपयांची चोरी

Spread the love

देवीचा चांदीचा मुखवटा पादुका, अलंकाराची चोरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री मंदिराचा शटरचा कडीकोंयडा तोडून चोरांनी देवीचा चांदीचा मुखवटा, पादुका, छत्री देवीचे सोन्याचे अलंकार अदमासे किंमत २.५ लाख रुपयांची चोरी करुन पोबारा केला आहे.


चोरीच्या घटनेची समजलेली माहिती अशी, कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री चोरांनी मंदिराचा शटरचा कडीकोंयडा तोडून आत प्रवेश केला. ‌मंदिरातील तीन किलो वजनाचे देवीचे चांदीचे दागिने, देवीचे सोन्याचे अलंकार घेऊन पोबारा केला आहे. चोरांनी देवीचा चांदीचा मुखवटा, पादुका, छत्री प्रभावळ, देवीचे सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले शिताफीने चोरुन तेथून पळ काढला आहे. आज सकाळी मंदिर खुले करतांना चोरीची घटना उघडकीस आली आहे. कणगला येथील श्री रेणुकादेवी मंदिर भर बाजारपेठत असून मंदिराच्या आजुबाजुला घरे आहेत. अशा भरवस्तीत चोरांनी धाडशी चोरी करुन देवीचे सोन्या-चांदीचे अलंकार घेऊन पोबारा केल्याने भक्तगणांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भरवस्तीत चोरांनी मंदिरावर घाला कसा घातला याविषयी लोकांत बरीच चर्चा केली जात आहे.
बसव सर्कलचे सीसीटीव्ही बंद
कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात धाडशी चोरीची घटना घडल्याने संकेश्वर पोलीस चोरांचा छडा लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. मंदिराच्या आसपास कोठेच सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरीच्या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत आहे. धाडसी चोरी प्रकरणात एकापेक्षा जास्त चोर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंदिरा जवळ बसव सर्कल आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो कॅमेरा बंद आहे. त्यामुळे चोर सहिसलामत निसटले आहेत. कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात पहिल्यांदाच चोरीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *