
संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या महागाईच्या जमान्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी होण्याची शक्यता कोठेच दिसेनासी झालेली असताना संकेश्वरातील मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो मटणचा दर शंभर रुपयांनी कमी करुन मासांहारी लोकांना दिलासा मिळवून देण्याचे कार्य केलेले दिसताहे. येत्या मंगळवार दि. 12 एप्रिल 2022 पासून संकेश्वरात मटण प्रतिकिलोचा दर 500 रुपये राहणार आहे. त्यामुळे मासांहारी लोकांना ही खुशखबर म्हणावी लागेल. इकीकडे देशात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. परिणामी वाहतूक आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. गोडतेलाने तर पावणे दोनशेचा आकडा गाढला आहे. स्वयंपाक गॅस सिलेंडर हजार रुपये झाले आहे. त्यामुळे गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे जीने हराम झाले आहे. संकेश्वरातील गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांंच्या खिशाला परवडेल असा दर संकेश्वर मटण-चिकन विक्रेत्यांनी निश्चित केल्याचे मटण विक्रेते सचिन भोपळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले मटण 600 रुपये किलो झाल्यामुळे गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांचा कल मटणापेक्षा चिकन खरेदीकडे राहिला आहे. त्यामुळे मटण विक्री बऱ्याच प्रमाणात घटली आहे. संकेश्वरातील आम जनतेचा विचार करुन मटण दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शंकर काळे, सागर गायकवाड, परशराम गायकवाड, बाळू गायकवाड, नितिन शेडगे, सुरेश भोपळे, संजय भोपळे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta