संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वरचे पोरोहित वामन पुराणिक, योगशिक्षक पुष्पराज माने यांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. उपस्थितांचे स्वागत योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी केले यावेळी वामन पुरानिक, सुरेखा शेंडगे, विजयालक्ष्मी भागवत यांनी श्रीराम नवमीचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमात गीता काकडे आर्य यांनी स्तोत्र भजन सादर केले. यावेळी निडसोशी हिरा शुगर इंजिनियरिंग कॉलेजचे प्रा. शिवानंद सारवाडी, मल्लाप्पा कुरबेटी, मुद्दाना ढंगी, नागराज नाईक, रावसाहेब कंबळकर, श्रीनिवास कोळेकर, सौ. शैलजा जेरे, रूपा चौगुला, रोहिणी वेनेसकर, प्रमिला देसाई, अंजली सुंदर, पद्मा हंजी, प्रेमा इंडी, सुरेखा काकडे योग साधक उपस्थित होते.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …