Tuesday , March 3 2026
Breaking News

रमेश जारकहोळी यांच्याकडून नष्टी परिवाराचे सांत्वन

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या अकाली निधनाने एक समाजसेवक हरपल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. त्यांनी नष्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन नष्टी परिवाराचे सांत्वन केले. ते म्हणाले दिवंगत संजय नष्टी हे समाजासाठी, संकेश्वरच्या विकासासाठी झटणारे नगरसेवक होते. संकेश्वरच्या लिंगायत रुद्रभूमीकरिता जागा हवी असल्याचे ते नेहमी सांगायचे. एक हरहुन्नरी नेता संकेश्वरकरांनी गमावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवकुमार नष्टी, सुजल नष्टी, प्रविण नष्टी, बोरगांवचे नेते उत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सुरेश हुंच्याळी, बसवराज बागलकोटी, आणप्पा संगाई, राहुल हंजी, कुणाल पोतदार, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक जितेंद्र मरडी, सचिन भोपळे, अ‍ॅड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, अभिजित कुरणकर, राजेश गायकवाड उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *