

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड यशागोळ काॅलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा हनुमान जयंती दिनी शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी होत असल्याची माहिती चंद्रशेखर यशागोळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ते म्हणाले यशागोळ काॅलनीत उभारण्यात आलेल्या पवनपुत्र मंदिराचे उद्घाटन हनुमान जयंतीला होत असल्याने भक्तगणांतून आनंद व्यक्त केला जात आहे. मंदिराचे उद्घाटन संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित नागरिक बसवराज बस्तवाडी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, युवा नेते संतोष कमनुरी, शिवानंद कमते (सीए), व्यापारी श्रीशैल्य सुनदाळी, संजय हादीमनी, अशोक संसुध्दी उपस्थित राहणार आहेत. भक्तगणांनी मंदिरात पवनपुतत्राचे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta