
संकेश्वर (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संकेश्वर बाजारात निळे ध्वज, फेटे-टोप्या बॅच (बिल्ले) यांना मोठी मागणी दिसली. येथील पुष्पंम सेंटर दुकानात निळे बॅच (बिल्ले) हातोहात विक्री झाले. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पुष्पंम सेंटरचे मालक पुष्पराज माने म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण दुकानात निळे ध्वज, शाल, फेटे-टोप्या बॅच (बिल्ले) किचेन विक्रीसाठी ठेवले आहेत. जयंती उत्सवाला लागणाऱ्या सर्वच वस्तूंना मोठी मागणी दिसत आहे. आपल्या दुकानातून निळे बॅच (बिल्ले) सर्रास विक्री झाले आहेत. आपल्याकडे निळे लहान-मोठे ध्वज उपलब्ध आहेत. त्याची किंमत २० ते ५०० रुपये आहे. निळे फेटे ८० ते १०० रुपये, निळी गांधी टोपी २० रुपये, शाॅल २० ते ७० रुपये, सोबत खिशाला लावण्याचे बॅच (बिल्ले) किचेन विक्रीसाठी उपलब्ध आहे. बॅच (बिल्ले) हातोहात विक्री झाले. निळे फेटे, टोप्या हे लोकांचे खास आकर्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta