
संकेश्वर (महंमद मोमीन) : बाड ग्रामस्थांची तहान भागविण्याचे कार्य बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके करताहेत. गेली दोन महिने झाली बाड ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ट्रॅक्टर टॅंकरने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम ते करताहेत. त्यामुळे ते बाड ग्रामस्थांची तहान भागविणारे अवलिया बनले आहेत. बाड गावातील सर्वच ग्रामस्थ प्रकाश मैलाके यांच्या घरपोच शुध्दपाणी पुरवठा कार्याची तोंडभरून कौतुक करतांना दिसत आहेत. बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणेचे काम करत आहेत. ते दिवसभर पाणीपुरवठा करण्याचे काम मनोभावे करताहेत.
ग्रामस्थांना शुध्द पेयजल..
पत्रकारांशी बोलताना बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके म्हणाले, बाड गावचा नळपाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आठवड्यात एकदा नळाला गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे बाड ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण स्वखर्चाने हे कार्य हाती घेतले आहे. गेली दोन महिने झाली आपण बाड गावातील सर्व लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी घरपोच पुरवठा करण्याचे काम आपण कर्तव्य भावनेतून करताहोत.
प्रकाश मैलाके आमचे देवदूत
येथील महिलांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या प्रकाश मैलाके हे आमचे दैवत आहेत. उन्हाळा सुरु झाला आणि पाणी टंचाई जाणवू लागली. पाणी कोठून मिळवायचे हा प्रश्न निर्माण होताच प्रकाश मैलाके हे स्वतः पिण्याच्या पाण्याचे ट्रॅक्टर टॅंकर घेऊन हजर झाले. आम्हा सर्व बाड ग्रामस्थांंना गेली दोन महिने झाली ते टॅंकरने शुध्द पिण्याचा पुरवठा करताहेत. प्रत्येकाला पुरेपूर पाणी मिळवून देण्याचे त्यांचे कार्य स्तुत्य आणि कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
बाड ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करणारे प्रकाश मैलाके यांचे कार्य आदर्शवत ठरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta