
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील मांसाहारी लोकांना मटण स्वस्त झाल्याची खुशखबर देणारे मटण विक्रेते शब्दाला जाणणारे दिसेनासे झाले आहेत. मटण पाचशे रुपये झाल्याचा फलक झळकविणारे मटण विक्रेते आता मटणाचा दर 560 रुपये सांगताहेत. मटणात किती मिक्स करुन दिली जाईल, असे सांगून मांसाहारी लोकांची भ्रमनिरास करताना दिसत आहेत. नंबर वन मटणाचा भाव 600 रुपयेच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे संकेश्वरातील मांसाहारी लोकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. मटण विक्रेत्यांनी मटण स्वस्त केल्याची खोटी जाहिरातबाजी केल्याचे लोकांतून सांगितले जात आहे. याविषयी मटण विक्रेते सचिन भोपळे यांना छेडले असता ते म्हणाले, बाजारात बकरींचा दर वाढल्याने मटण स्वस्त देणे परवडत नाही. आम्ही मटण 500 रुपये किलो देणेचा निर्णय घेतला होता. पण तो मटण विक्रेत्यांच्या चर्चेत मागे घ्यावा लागला आहे. बकरींचा दर जादा असला तरी आम्ही 560 रुपये किलो दराने मटण विक्री करत असल्याचे सांगितले.
मटण दरात चढ-उतार
संकेश्वरात मटणाचा दर कोणी 560 रुपये किलो तर कोणी 600 रुपये लावला आहे. त्यामुळे संकेश्वरात मटण दरात तफावत दिसत आहे. संकेश्वरात मटणाचा एकच भाव नसल्यामुळे लोकांत मोठा संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे. मटण विक्रेत्यांनी गावात एकच भाव ठेवून चांगले मटण देण्याची मागणी लोकांतून केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta