
संकेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वारकरी मंचने बेळगांव जिल्हाध्यक्षपदीची धुरा संकेश्वरचे सचिन तानाजी नाईक यांच्याकडे सोपविली आहे. वारकरी मंचचे पहिले-वहिले जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक निवडले गेले आहेत. सामाजिक बांधिलकी आणि संत विचारांचा प्रभाव या गोष्टींमुळे वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हभप निलेशमहारज कोंडे-देशमुख आळंदीकर यांच्या सुचनेनुसार सचिन नाईक यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बेळगांव जिल्ह्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.
गजानन सौहार्दचा शिपाई बनला जिल्हाध्यक्ष
संकेश्वर येथील गजानन सौहार्द सहकारी संस्थेत सचिन नाईक हे शिपाई म्हणून सेवा बजावित आहेत. ते पांडुरंगाचे भक्त असून आषाढी वारीत त्यांचा सहभाग राहिला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वारकरी मंचचे नूतन बेळगांव जिल्हा अध्यक्ष सचिन म्हणाले, सर्व पांडुरंगाची कृपा आहे. माझ्यासरख्या सामान्य व्यक्तीकडे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. आपण वारकरी मंचच्या आदेशानुसार बेळगांव जिल्ह्यातील शाळा-काॅलेजमधील युवकांना व्यसनमुक्त करण्याचे काम करणार आहोत. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी गावा-गावात अखंड हरिनाम सप्ताह, सामुदायिक नमस्कार सोहळ्याचे आयोजन. लोकांत धर्माप्रती आस्था निर्माण करण्याचे कार्य आपण निश्चितपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गजानन सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष डी. एन. कुलकर्णी यांनी सचिन नाईक यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्षपदी निवड झालेबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta