

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता गायकवाड मळा येथील श्री रेणुकादेवी मंदिराचा आंबिल महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. परंपरागत पध्दतीने सकाळी श्री मातंगी देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. यामध्ये महिला भक्तगण सहभागी झाले होते. गायकवाड मळा श्री रेणुकादेवी मंदिरात देवीची विधिवत पूजा करुन आरती सादर करण्यात आली. तदनंतर प्रसादपूजा झालेनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरात श्री रेणुकादेवीचे दर्शन घेवून भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संकेश्वरचे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, डॉ. मंदार हावळ, जयप्रकाश सावंत भक्तगणांनी श्रीरेणुकादेवी आंबिल महाप्रसाद कार्यक्रमात आपला सहभाग दर्शविला. श्री रेणुकादेवी यात्रोत्सव आणि जिर्णोध्दार कमिटीचे शिवाजी गायकवाड, डॉ शंकर गायकवाड, महादेव केसरकर, नेताजी आगम महादेव गायकवाड, सुभाष गायकवाड, कमिटीचे सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांनी आंबिल महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मंदिरात श्री रेणुकादेवी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta