
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ उद्या रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन संकेश्वर मेडिकल असोसिएशन, संकेश्वर औषध व्यापारी संघटना, संकेश्वर क्रिडा संघ, संकेश्वर वाॅकर्स क्लब आणि वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शिबिरत रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदानाने दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करावयाची आहे. रक्तदान शिबिराविषयी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ म्हणाले, संकेश्वरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता, कन्या शिया यांचे अपघाती निधन झाले. संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांचे अल्पशा आजाराने आणि श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करुन मृतात्म्यांना खरीखुरी श्रध्दांजली अर्पण केली जात आहे. रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाने उपरोक्त दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करावयाची आहे. रक्तदानाचे महत्व तसे मोठे आहे. एखाद्या रुग्णांचे प्राण वाचविण्यास आपल्या अनमोल रक्ताचा उपयोग होऊ शकतो. संकेश्वरातील दिवंगत महनिय व्यक्तींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9972274545, 9060033885, 9742376805 संपर्क साधावयाचा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta