

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 163 रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन संकेश्वर मेडिकल असोसिएशन, संकेश्वर औषध व्यापारी संघटना, संकेश्वर क्रिडा संघ, संकेश्वर वाॅकर्स क्लब आणि वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिबिरत 163 रक्तदात्यांनी रक्तदानाने दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण केली. रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, 163 रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाने दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. रक्तदान शिबिरात मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी, वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राच्या महिला साधकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे. शिबिराला महिलांचा 30% प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने डॉ. विकास पाटील, डॉ. विनोद गायकवाड, डॉ. संदिप पाटील, डॉ. गिरीश कुलकर्णी,
डॉ. आळतेकर, शिवा बोरगांवी, सुभाष कासारकर, समीर पाटील, राजू गडकरी, सर्जेराव गायकवाड, राजू सुतार यांचा समावेश होता. अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक गडहिंग्लज, अंकुर ब्लड बँक निपाणी-चिकोडी यांनी रक्त संग्रहणाचे कार्य केले. संकेश्वरचे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, युवानेते पवन कत्ती, संकेश्वर आयएमचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार हावळ, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, राजेंद्र बोरगांवी, नंदू मुडशी, संतोष कमनुरी, डॉ. चंद्रकांत पाटील, जयप्रकाश सावंत आदी मान्यवरांनी शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. मंदार हावळ, सुनिल पर्वतराव, डॉ. जयप्रकाश करजगी, मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, डॉ. संतोष खज्जण्णावर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta