
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमी व एस.के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चर अकॅडमी यांच्यावतीने नुकतेच बेळगाव येथे पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी इनलाईन व क्वाड स्केटिंग 500 मी. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत आराध्या भमानगोल, श्रेयांश पांडे, जिया काझी, आरोही शिलेदार, वेद बेल्लद प्रितम निलाज, विश्र्वतेज पवार, दक्ष जाधव, वेदांत तोडकर, वीरा गंधवाले, अधीराज कामते, सावी तोडकर, धैर्यशिल वटकर,भाग्यरथी पाटील, प्रर्चीता शेरेकर, वेदांत पाटील
प्रथमेश गुरव विजेते स्पर्धक ठरले आहेत. विजेत्या स्केटरना प्रशिक्षक अजितसिंग शिलेदार यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभल आहे.
Belgaum Varta Belgaum Varta