
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेली नगरसेवकपदाची जागा भरुन काढण्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २ मे २०२२ पासून निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होत आहे. २ ते ९ मे २०२२ अखेर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० मे २०२२ रोजी उमेदवार अर्जाची छाननी होणार असून १२ मे २०२२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २० मे २०२२ रोजी मतदान आणि २२ मे २०२२ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
भाजप-काॅंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरसेवक होण्यासाठी अनेकजण इच्छूक असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. येथील लढतीसाठी भाजपातर्फे शासननियुक्त नगरसेवक रोहण नेसरी, व्यापारी नंदू मुडशी, बसवराज बागलकोटी, ॲड.प्रविण नेसरी तर काॅंग्रेसतर्फे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, प्रकाश नेसरी, सनी पचंडी, कुणाल पोतदार यांच्या नावाची जोरदार चर्चा केली जात आहे.
नष्टी परिवाराला सहानुभूती
दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी नष्टी परिवारातील एखाद्या सदस्यांनी इच्छा जाहीर केल्यास त्यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta