
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते शिवपुतळा चौथरा पायाखुदाई करण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानिू्ंसह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले.
यावेळी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, संकेश्वरातील असंख्य शिवप्रेमींचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकारत आहे. संकेश्वरातील तमाम हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या आपल्याकडून शुभेच्छा. येथील शिवाजी चौकात शिवपुतळा चौथरा उभारणीचे कार्य आता जोमात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, डॉ. टी. एस. नेसरी, बाळासाहेब वैरागी, नगरसेवक अमर नलवडे, सचिन भोपळे, विवेक क्वळी, प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, श्रीविद्या बांबरे, माजी नगरसेवक दिपक भिसे, राजू बांबरे, जयप्रकाश सावंत, राजेंद्र बोरगांवी, अमोल गोंधळी, राजेश गायकवाड, बंडू सुर्यवंशी, संदिप गोंधळी, दत्ता दवडते, सुहास कुलकर्णी, शाम यादव, समीर पाटील, माजी उपनगराध्यक्षा सविता सावंत, शशीकला मोरे, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवपुतळा चौथर्याचे भूमिपूजन पुरोहित वामन पुराणिक यांनी केले.
संकेश्वरात शिव पालखी-शिवज्योतचे जंगी स्वागत

संकेश्वरात शिव पालखी आणि विविध गडकिल्ल्यांवरुन धावत आणलेल्या शिवज्योतीचे भव्य आणि जंगी स्वागत करण्यात आले. शिवतेज तरुण मंडळ संसुध्दी गल्ली येथील शिवप्रेमींनी जंजिरा, हनुमान तरुण मंडळ कोळेकर गल्ली (अजिंक्यतारा), बालराजे तरुण मंडळ शिवाजीनगर पोवार चाळ (वल्लभगड), शिवबसव मंडळ अंकले रस्ता (सिंधुदुर्ग), हनुमान तरुण मंडळ नदी गल्ली (पन्हाळा), शिवप्रेमी तरुण मंडळ गोंधळी गल्ली (सिंधुदुर्ग), शिवज्योत तरुण मंडळ मठ गल्ली (भुदरगड) शिवप्रेमींनी धावत आणलेल्या शिवज्योतीचे गावात सर्वत्र स्वागत होताना दिसले. शिवपालखी सोहळ्यात महिला आणि शिवकन्या मराठमोळ्या पोषाखात सहभागी झालेल्या दिसल्या. शिवपालखी सोहळ्यात माजी उपनगराध्यक्षा सविता सावंत, डॉ. स्मृती हावळ, अरुणा कुलकर्णी, शशीकला मोरे, शिवकन्या तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta