Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात ईदमध्ये भाईचाराचा संदेश…

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) हर्षोल्लासात साजरी केली. मुस्लिम बांधवांना तब्बल दोन वर्षानंतर ईदगाहवर ईदची नमाज पठन करता आली. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांत मोठा आनंद पहावयास मिळाला. येथील सुन्नत जमातने नमाजमाळ येथील ईदगाहवर ईदची नमाज अदा केली. मोमीन समाज बांधवांनी अंकले रस्ता येथील ईदगाहवर ईदची नमाज पठन केली. नमाजमाळ ईदगाहवर नमाजनंतर. सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी हुसैन मोकाशी, मुक्तार नदाफ, रियाज फणीबंद, मुस्तफा मकांनदार, अकरम जांबोटी, इम्रान नालबंद, मुसिफ नदाफ, इरफान तेरणी, अमीन कुमनाळी आणि समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या.


अंकले रस्ता येथील ईदगाहवर मोमीन समाज बांधवांनी ईदची नमाज पठन केली. नमाजनंतर हाजी महंमदहुसैन गडंमफल्ली म्हणाले कोरोनाच्या महामारीनंतर तब्बल दोन वर्षानंतर आम्हाला ईदगाहवर ईदची नमाज पठन करता आली. गेले महिनाभर चाललेल्या रमजान उपवास, तहराबे नमाज आणि आजच्या ईदच्या नमाजमध्ये आम्ही तमाम हिंदू-मुस्लिम बांधवांंसाठी दुआ मागितली आहे. हिन्दू-मुस्लिम बांधवांत भाईचारा कायम रहावा. सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे आणि कोरोना महामारीने रोजगार गमाविलेल्या लोकांना रोजगार मिळावा अशी प्रार्थना केली आहे. यावेळी शफीउल्ला अथनी, झाकीर मोमीन, अल्ताफ कारेकाजी, शब्बीर कारेकाजी, अक्तर कारेकाजी, महामूद मोमीन, कुनमिर मोमीन, हाजी मैनोद्दिन कारेकाजी, बुरहान मोमीन, हारुण नेसरगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *