Saturday , October 19 2024
Breaking News

प्रभाग १३ ची पोटनिवडणूक नेसरी विरुद्ध नेसरी होणार?

Spread the love


अण्णा-तम्मा लढतीसाठी सज्ज
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगरसेवक निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नुकतेच काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेऊन सर्वानुमते काॅंग्रेस उमेदवार म्हणून ॲड. प्रविण एस. नेसरी निवडले गेले आहेत. त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन हळुवारपणे प्रचार सुरू केलेला दिसताहे. भाजपाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेलीं नसली तरी शासननियुक्त नगरसेवक रोहण नेसरी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद करण्याची विनवणी करताहेत. भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे ते सांगताहेत. भाजपातर्फे प्रभाग १३ मधून निवडणुकीसाठी चार-पाच इच्छूक आहेत. पैकी कोणाला उमेदवारी मिळणार इकडे मतदारांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती लवकर येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अण्णा-तम्माची लढत लक्षवेधी ठरणार ?
काॅंग्रेसने ॲड. प्रविण नेसरी यांना आखाड्यात उतरविले आहे. आता भाजपाने सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी यांना आखाड्यात उतरविणेचा निर्णय घेतल्यास अण्णा-तम्माची लढत तशी लक्षवेधी ठरणार आहे. ॲड. प्रविण नेसरी हे रोहण नेसरी यांचे वडीलबंधू आहेत. त्यामुळे निवडणुकीत दादा विरोधात भाऊ आखाड्यात दिसणार आहेत. येथील भाजपा हायकमांड एपीएमसी संचालक, व्यापारी नंदू मुडशी, बसवराज बागलकोटी, अर्जुन करजगी, रोहण नेसरी पैकी कोणाला उमेदवारी देणार इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *