Tuesday , March 3 2026
Breaking News

भारतीय नवनिर्माण सेनेकडून उपतहसीलदारांना भू-सेना भरतीचे निवेदन

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरमध्ये आज भारतीय नवनिर्माण सेनेकडून भू- सेना भरती परीक्षा लवकरात लवकर घेण्याविषयीचे निवेदन उपतहसीलदार यांना देण्यात आले, याविषयीची माहिती देताना भारतीय नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विकास ढंगे म्हणाले, कोरोना महामारीने गेली दोन वर्षे झाली भू-सेना भरती परिक्षा होऊ शकलेली नाही. याविषयी आम्ही भारताचे संरक्षण मंत्रीमहोदयांना आर्मीची (भू-सेना) परिक्षा गेली दिड-दोन वर्षे झालेली नसल्याचे निवेदनाद्वारे निर्दशनाला आणून दिले आहे. भू-सेनेत भरती होण्यासाठी लाखो युवकांनी तयारी चालविली आहे. कांही युवक भरतीचे कार्य होऊ शकलेले नसल्यामुळे नैराश्य होऊन आत्महत्या करु पहाताहेत. कर्नाटकात कांही युवकांनी आत्महत्या केली आहे. या गोष्टी सरकार का गांभीर्याने घेत नाही. हेच कळेनासे झाले आहे. सरकारने अद्याप कोरोनाचे कारण पुढे करुन भरती प्रक्रिया लांबविण्याचे कार्य करीत आहे. कोरोना समाप्त झालेला असला तरी भू-सेना भरती प्रक्रियेत सरकार कोरोनाचे कारण पुढे करीत आहे. अजून परीक्षा का घेत नाही कोरोनाचे कारण सरकार देत आहे. कोरोना समाप्त झालेला असल्याने सरकारने भू-सेना भरती प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्याची मागणी भारतीय नवनिर्माण सेनेचकडून संरक्षण मंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

खासदार विनायक राऊत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, यांना आम्ही भू-सेना भरतीचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्याविषयी कळकळीची विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी भारतीय नवनिर्माण नागराज कणगली, शुभम करमे, बसवराज हलगडगी, मंजुनाथ मादर, नविन बचगोळ, विशाल करमे, अनिश पोवार, विशाल जरळी, पवन सूर्यवंशी, ओंकार लोहार, पराग लोहार, सतीश सूर्यवंशी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *