
संकेश्वर (प्रतिनिधी) : गरोदर महिलांनी (नाॅर्मल डिलेवरी) सामान्य प्रसुतीसाठी योग-प्राणायम करायला हवे असल्याचे डॉ. शामला पुजेरी यांनी सांगितले. संकेश्वर शासकीय रुग्णालयात गरोदर महिलांसाठी आयोजित योग शिबिरात बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर पतंजली योग समितीचे योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी गरोदरपणात महिलांनी कोणती आसने आणि प्राणायाम कसे करावे याची माहिती देत पाच-सहा आसनांचा सराव करुन घेतला. शासकीय रुग्णालयाचे वैद्याधिकारी डॉ. दत्तात्रय दोडमनी यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.
डाॅ. शामला पुजेरी पुढे म्हणाल्या, महिलांना गरोदरपणात उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराॅईड,अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे गरोदर महिला मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या असतात. यामुळे प्रसुतीप्रसंगी अडचणी निर्माण होतात. डिलेवरी सरळ सामान्य होण्यासाठी गरोदर काळात महिलांनी सहजसोपी योगासने आणि प्राणायाम केल्याने त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो असे सांगितले.
यावेळी डॉ. पौर्णिमा तल्लूर, विक्रांत रायप्पगोळ, परिचारिका लता, गरोदर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta