संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि संकेश्वर आर्मी अभिमानी बळगतर्फे आर्मी परिक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाची प्रत देशाचे संरक्षण मंत्री नामदार राजनाथ सिंह यांना उपतहसीलदार यांचेमार्फत पाठवून देण्यात आली आहे. उपतहसीलदार यांना निवेदन सादर करुन बोलताना श्रीरामसेना हिन्दुस्तान हुक्केरी तालुका अध्यक्ष शाम यादव म्हणाले, कोव्हिड-19 मुळे गेली दोन वर्षे झाली भू-सेना (आर्मी) भरती परिक्षा होऊ शकलेली नाही. त्यामुळे भू-सेनेत भरती होऊ इच्छिणाऱ्या बहुसंख्य युवकांची भ्रमनिरासा झाली आहे. भू-सेनेत भरती होण्याचे स्वप्न साकार होईनासे झाल्याने अनेक युवकांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारल्याच्या घटना घडल्या आहेत. गेली दोन वर्षे झाली भू-सेना भरतीचे कार्य होऊ शकलेले नसल्यामुळे आर्मी भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांचे वय दोन वर्षांनी वाढले आहे. संरक्षण मंत्रीमहोदयांनी या गोष्टीचा विचार करून आर्मी भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवेदनाचा स्विकार महसूल अधिकारी हिट्टणगी यांनी केला. निवेदन सादर करताना श्रीरामसेना हिन्दुस्तानचे हुक्केरी तालुका अध्यक्ष शाम यादव, समीर पाटील, अमोल गोंधळी, विकास ढंगे, राजशेखर गस्ती, भिमा कानोजी, प्रविण गडकरी, श्रीशैल्य पाटील, बंडू भडगांवी, अजय हुदले, आकाश पवार, संतोष दुग्गी, अजय खोत, विनायक खनदाळे, बिरु करिगार, काशीनाथ खोत, राहुल मंकाळे, तसेच आर्मी बळगचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta