संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. इकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचे गणेश परीट यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे वाहनधारकांची पंचाईत होतांना दिसत आहे. येथील कारेकाजी पेट्रोल पंप नजिकच्या संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. त्यातूनच दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची ये-जा चालू असते त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर इतस्त पसरलेले दिसत आहे. दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांनी हा विषय उचलून धरला होता. त्यामुळे मध्यांतरी मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद यांनी येथे गटार निर्माणचे काम हाती घेणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. येथील कारेकाजी पेट्रोल पंप बाजूच्या नवीन वसाहतीमध्ये रस्ता गटार निर्माणचे काम केले गेलेले नसल्यामुळे येथील सांडपाणी संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. त्याचप्रमाणे येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्या शेजारी देखील गटारांची व्यवस्था करणेची आवश्यकता आहे. पालिका अधिकारी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असल्याचे सांगून अंग काढून घेण्याचे काम करताहेत. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, नगरसेविका शेवंता कब्बूरी यांनी सदर विषय गांभीर्याने घेऊन येथे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार निर्माणचे काम करायला हवे असल्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.