संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील पादगुडी श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे येथील यात्रा होऊ शकलेली नव्हती. यंदा मात्र यात्रोत्सव साजरी करण्यात आली. पादगुडी श्री बसवेश्वर देवस्थान पुरातन कालीन असून येथे विजयादशमीला सोने लुटणेचा कार्यक्रम परंपरागत पध्दतीने पार पडला जातो दसरा असो दिपावली येथूनच गावातील देव-देवतांचा पालखी उत्सव प्रारंभ करण्याची प्रथा कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पादगुडी श्री बसवेश्वर देवस्थानला मोठा भक्तगण लाभला आहे.यात्रोत्सव निमित्त श्री बसवेश्वर देवाचा अभिषेक महापूजा रुद्राभिषेक पुरोहित मोहन हिरेमठ यांनी केले. त्यांचेच हस्ते प्रसाद पूजनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. यात्रोत्सवात संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, चिदानंद कर्देण्णावर, बाबूराव हालदेवरमठ, शिवकुमार नष्टी, सुधीर पाटील, कुमार कब्बूरी, बबलू मुडशी, शुभंम बागलकोटी, सोनू बेळवी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रोत्सवाचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा पंचकमिटीने विशेष परिश्रम घेतले. यात्रोत्सव निमित्त हाफपिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta