
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासासाठी निवडणूक रिंगणात असल्याचे येथील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण एस. नेसरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आपणाला निवडणूक लढविण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यांचा आशीर्वाद आणि बहुमोल मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक लढवित आहे. माझा पेशा वकिली असला तरी मी प्रभागातील जनतेच्या कामाला, सामाजिक कार्याला प्राधान्य देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. प्रभाग क्रमांक १३ ची जनता सूज्ञ आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपणाला निश्चितच मिळणार यात तीळमात्र शंका नाही. प्रभागाची सुधारणा हे आपले लक्ष राहणार आहे.आंमचे काॅंग्रेसचे दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या प्रभाग सुधारणा कार्याचा वारसा आपण पुढे चालविणार आहोत. प्रभागात ज्या काही समस्या आहेत. ते सोडविणे आपले आद्य कर्तव्य राहणार आहे. प्रभागातील जनतेच्या हाकेला धावून जाणारा मी एक सच्चा कार्यकर्ता असल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा आपणाला लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काॅंग्रेसचे नेते बसनगौडा पाटील, शिवकुमार नष्टी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, नगरसेवक जितेंद्र मरडी, दिलीप होसमनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta